
वाशी : काबाडकष्ट करून जगवलेले पंधरा एकरांतील पीक रात्रभर झालेल्या धो-धो पावसाने अक्षरशः नासले. पाऊस पडून आठवडा उलटला तरी शेतात अजूनही पाण्याचे तळे साचले आहे. याच पाण्याखाली पीक गेल्याने खरीप हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आशेवरही पाणी फिरल्याने शेतकरी हताश झाले आहेत.