
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या पावसाने रविवारी (ता. १७) रात्री झोडपून काढले. अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बहुतांश प्रकल्प भरले आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत.