Dharashiv Rain: ताज्या जखमांवर पुन्हा पावसाचे पाणी; कळंब तालुक्यात पुन्हा नुकसान, नदीकाठच्या सोयाबीनच्या गंजीही गेल्या वाहून
Agricultural Loss: कळंब तालुक्यात शनिवारी मुसळधार पावसाने सोयाबीनची गंजी वाहून गेल्या; नदीकाठच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाडोळी येथील निपाणी-पाडोळी ओढ्यात वाहून गेलेल्यामुळे विजयकुमार सत्यनारायण जोशी यांचा मृत्यू झाला.
कळंब : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी पिकांसकट वाहून गेल्या. त्यातच २९ सप्टेंबरनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची गंजी करून ठेवलेल्या होत्या.