Dharashiv Rain: धाराशिवच्या चार तालुक्यांत मुसळधार पाऊस; पाच दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार तडाखा
IMD Update: पाच दिवसांच्या उसंतीनंतर धाराशिव, भूम, कळंब आणि वाशी तालुक्यांत पुन्हा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पूरस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटला असून, एका शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे.
धाराशिव : थैमान घालणाऱ्या पावसाने पाच दिवस उघडीप दिल्यानंतर शनिवारी (ता. चार) मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत पुन्हा झोडपून काढले. जिल्ह्यातील कळंब, भूम, धाराशिव व वाशी तालुक्यांत आकाश फाटल्यागत पाऊस झाला.