
Dharashiv Flood
sakal
धाराशिव : वाशी, भूमसह कळंब तालुक्यातील इटकूर मंडळांत शुक्रवारी (ता.१९) पहाटेपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीचा तडाखा पाठ सोडायला तयार नसल्याने शेतशिवारांत पिकांऐवजी फक्त पाणी उरले आहे. इतका पाऊस पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगत असे नुकसान कधीच झाले नाही, असे यापूर्वी अनुभवले नाही, असे जुने-जाणते शेतकरी सांगू लागले आहेत.