shaikh farid vajara waterfall
sakal
माहूर - तालुक्यातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या शेख फरीद वजरा धबधब्यात रविवार ता. २ रोजी सायंकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. सायंकाळी पाच वाजता दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला व पाण्याचा जोर वाढल्याने नागपूर येथील सात पर्यटक त्यात एक महिला, तीन मुली आणि तीन पुरुष हे धबधब्याच्या पायथ्याशी अडकले होते.