

Highway Collision: Overcontrolled Tractor Smashes Passenger Auto on Khanapur-Allapur Belt
देगलूर : एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला ट्रॅक्टरने धडक दिल्याने ऑटोतील नऊ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री खानापूर आलापूर रस्त्यावर घडली. यातील तीन प्रवाशांची प्रकृती अति गंभीर बनल्याने त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.