Hingoli Festivalsakal
मराठवाडा
Hingoli Festival: बैलांसोबत ट्रॅक्टरलाही सन्मान; कनेरगावचा आगळावेगळा पोळा, २५ वर्षांची परंपरा
Farmers Festival: हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे बैलपोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळाही २५ वर्षांपासून साजरा केला जातो. यावर्षी हा ट्रॅक्टर पोळ्याचा २६ वा वर्षाचा सोहळा असून ग्रामस्थांचा उत्साह दुप्पट झाला आहे.
कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : येथे पंचवीस वर्षांपासून पोळा सणाला बैलासोबतच ट्रॅक्टरलाही मान दिला जातो. हा पोळा पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिक उपस्थित राहतात. यंदा ट्रॅक्टर पोळ्याचे हे २६ वे वर्ष आहे.