मुरुमाची वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

शहरामध्ये दिवसाढवळ्या अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक
सुरू असून, महसूलच्या पथकाने सोमवारी (ता. 19) केलेल्या कारवाईमध्ये मुरुमाची
अवैधरीत्या वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहे.

सिल्लोड, ता. 19 (जि.औरंगाबाद) : शहरामध्ये दिवसाढवळ्या अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक सुरू असून, महसूलच्या पथकाने सोमवारी (ता. 19) केलेल्या कारवाईमध्ये मुरुमाची अवैधरीत्या वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहे.

सिल्लोडचे मंडळ अधिकारी विनोद धोकटे, तलाठी अभिलाषा म्हस्के यांनी विनापरवानगी मुरुमाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर कारवाई केली. वाळूमाफियांसह मुरूममाफियांनीही शहरात अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक सुरूच ठेवली आहे.शहरालगतच्या डोंगरांची मुरूम माफियांकडून चाळणी केली जात आहे.

या ठिकाणाहून शहरातील वसाहतींमधून भरधाव वेगाने मुरुमाचे ट्रॅक्‍टर जात असल्यामुळे
वसाहतींमधील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बोलावे कोणाशी
अशी व्यथाच काही नागरिकांनी बोलून दाखविली. गल्लीत मुले नेहमी खेळत असताना
वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्‍टरमुळे त्यांच्या जिवाला धोका असल्याचेही काही
नागरिकांनी बोलून दाखविले. शहरात ठरवून जोरदारपणे अवैधरीत्या सुरू असलेल्या
मुरुमाच्या वाहतुकीला लगाम घालणे आवश्‍यक आहे. महसूलच्या पथकाने सातत्याने
कारवाईचा बडगा उगारून अवैधरीत्या सुरू असलेल्या मुरूम वाहतुकीस आळा
घालणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor siezed