
बर्दापूर : दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक होवून तिघाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना ता .२८ शनिवार रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर ते हातोला जाणाऱ्या रस्त्यावर लिंबगाव पाटीजवळ घडली असून अभय सतीश चव्हाण (वय २५, रा. हातोला तालूका अंबाजोगाई फारूख रहिमखां पठाण व नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा.पानगाव तालूका रेणापूर असे मृत्यू झालेल्यांची नावे असून ऋषिकेश चव्हाण हे गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्पणालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.