deepak vavhale
sakal
बीड - जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारी (ता. ११) मैदानी चाचणीदरम्यान सोळाशे मीटर धावल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने प्रथमोपचारानंतर रुग्णालयात नेत असताना तरुणाचा वाटेत मृत्यू झाला. दीपक भास्कर वाव्हळे (वय २६, रा. मांडखेल, ता. परळी) असे त्याचे नाव आहे.