Swimming Accident : जालन्यात तलावामध्ये बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Jalna News : जालन्यातील मोती तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. वाचविण्याच्या प्रयत्नात मोठा भाऊही मृत्यूमुखी. शोधमोहीमीनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढले; शेर सवारनगर परिसरात शोककळा.
जालना : शहरातील मोती तलावामध्ये बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २६) दुपारी घडली. जुनेद आसेफ सय्यद (वय १९) आणि आयान आसेफ सय्यद (वय १६, दोघे रा. शेर सवारनगर, जालना) अशी मृत भावांची नावे आहेत.