Kailas Magar and Sanjay Khatal
sakal
सिल्लोड – छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे उभ्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही निल्लोड येथील रहिवासी असून या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावात दिवसभर अनेक घरांत चूल पेटली नाही.