raju dhepe
sakal
शेंदुरवादा - जगात सगळ्या गोष्टीचे सोंग आणता येते. पण, भुकेचे नाही. भाकरीसाठीचा संघर्ष स्थलांतर करायला भाग पाडतो. कधीकधी या संघर्षाचा शेवटही मनाला वेदना देणारा होतो. जिच्यासाठी जिवाचे रान केले ती भाकरीच रक्तात न्हाऊन जाते.
कोणत्याही सुज्ञ माणसाचे मन सुन्न व्हावे, असाच एक अपघात शेंदूरवादा परिसरात घडला. ऊसतोडीला जाताना ट्रकने बैलगाडीला उडविले, यात ऊसतोड मजूर ठार झाला तर मुलगा व पुढील बैलगाडीतील तीन ऊसतोड कामगार व बैल ही गंभीर जखमी झाले.