भोकरदन - तालुक्यातील धावडा येथील दोन महिला भाविक पंढरपूर येथील चंद्रभागा नदी बुडून मरण पावल्या. पहाटे स्नान करून लवकर विठुरायाचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांची अखेर अपूर्णच राहिली. या घटनेमुळे तालुक्यातील धावडा वासियांवर शोककळा पसरली आहे..तालुक्यातील धावडा येथील येथील 15 महिला व दोन पुरुष भाविक शुक्रवारी भोकरदन येथून फलटण बसने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण रात्री पंढरपूरला पोहोचले व मुक्ताबाई मठात मुक्काम केला. दर्शनवारीत लवकर नंबर लागावा म्हणून शनिवारी पहाटे पुंडलिक मंदिराजवळ महिला भाविक चंद्रभागेत स्नानासाठी उतरल्या..प्रवाहाचा अंदाज न आल्याने संगीता संजय सपकाळ (वय-40 वर्षे) या वाहून जात असताना त्यांची जाऊ सुनिता महादेव सपकाळ (वय-41 वर्षे) यांनी वाचवण्यासाठी अंगावरील साडी फेकली. प्रवाह जास्त असल्यामुळे दोघेही प्रवाहात वाहून गेल्या.त्यांच्यासोबत असलेल्या गावातील इतर महिलांनी त्यांना वाचण्यासाठी आरडा-ओरड केली. त्यांच्या हाकेला उपस्थित पुरुष धावून आले. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले व दोघी जावा पाण्यात बुडाल्या..बराच वेळ शोधून देखील दोघी महिला सापडल्या नाही. यावेळी उपस्थित स्थानिक कोळी यांनी महिलांचा शोध घेतला असता सकाळी आठ वाजता संगीता संजय सपकाळ यांचे प्रेत सापडले व दुपारी एक वाजेच्या दरम्यान सुनीता महादेव सपकाळ यांचे प्रेत सापडले..धावडा गावावर शोककळाधावडा येथील पंढरपूरला गेलेल्या या सर्व महिला व पुरुष एकाच गल्लीतील आहेत. संगीता व सुनिता दोघी सख्या चुलत जावा असून, परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. धावडा गावात एकही चूल पेटली नसून स्थानिक प्रशासनाने दोन्ही महिलांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे..नातेवाईक तातडीने पंढरपूरला रवानाघटनेची माहिती धावडा येथे मिळताच दोन्ही मयत महिलांचे पती संजय सपकाळ व महादेव सपकाळ हे नातेवाईकाना सोबत घेऊन पंढरपूरला सायंकाळपर्यंत पोहोचले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.