bike accident
sakal
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील मुळगाव धनगरपिंपळगाव येथील व सध्या बदनापूर तालुक्यातील देवगाव तांडा येथे काम धंद्याच्या निमीत्ताने वास्तव्यास असलेला तीस वर्षीय तरुण प्रवीण कमलाकर पांजगे हा गावाकडून आपली सासरवाडी असलेल्या कौवडगाव येथे दुचाकीवरून सोमवारी (ता. 27) दुपारी एक वाजेच्या सुमारास रोहिलागगड -अंबड मार्गावरून अंबडकडे जात असताना मार्डी फाट्यालगत असलेल्या जिनिंग जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने डोके फुटून रस्त्यावर रक्त वाहू लागले.