मानवत - तालुक्यातील यशवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग 61 मानवत परभणी रस्त्यावर दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 9 मे रोजी दुपारी 2:45 वाजता घडली..अनिलराव लक्ष्मणराव जाधव (वय-५५ वर्षे) आणि आशामती अनिलराव जाधव (वय-५०) रा. खांडवीवाडी, ता. परतूर, जिल्हा जालना हे पती-पत्नी दुचाकी क्रमांक एमएच 20 एफए 7568 वरून मानवत तालुक्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात दर्शनासाठी आले होते..दर्शन घेऊन परत गावाकडे जाण्यासाठी निघाले त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्गावर आली असता परभणी कडून बीडकडे जाणारी एस टी बस क्रमांक एमएच 14 एमएच 1561 या बसने समोरासमोर दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अनिलराव जाधव आणि त्यांच्या पत्नी अशामती जाधव यांचा जागीच मृत्यू झाला..घटनेची माहिती मिळताच, स.पो.नि. संदीप बोरकर, पो.उ.नि. प्रमोद देवकते, किशन पतंगे, पो.ह. अतुल पंचांगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह मानवत तालुक्यातील कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. देवदर्शनासाठी आलेल्या पती-पत्नीचा असा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने यशवाडी मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.