eicher truck hit two wheeler
sakal
- बाळासाहेब काळे
करमाड - नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून मशाल ज्योत घेऊन गोळेगाव-गदाना (ता. खुलताबाद) येथे जाणाऱ्या भाविकांना पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रेड अॅपल फर्निचरसमोर शनिवारी (ता. १०) रात्री सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत अक्षय राजपूत, अमोल आवटे आणि गोरख मस्कर या तिघांचा मृत्यू झाला, तर शुभम आदाने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आयशरचालक वाहनासह पसार झाला.