gayatri shinde and prasad shinde
sakal
औसा - तालुक्यातील वाघोली गावातील बहीण भावाचा औसा-तुळजापूर रोडवर पोतदार शाळेसमोर अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या भावंडांच्या दुचाकीला भरधाव कारने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडले. या दुर्दैवी घटनेने वाघोली गावावर शोककळा पसरली आहे.