Vasmat Accident : ट्रॅक्टर विहीरीत कोसळला! अपघातामध्ये आठ महिला ट्रॅालीखाली दबून दगावल्याची भिती

शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघालेल्या महिलांवर काळाचा घाला.
tractor fell into well
tractor fell into wellsakal
Updated on

वसमत - वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी असलेल्या आठ महिला आलेगाव (जि. नांदेड) शिवारात शुक्रवारी ता. ४ सकाळी ट्रॅक्टर विहीरीत पडून दगावल्याची भिती व्यक्त होत असून आमदार राजू नवघरे यांच्यासह महसूल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मदत व बचावकार्य सुरु आहे.

वसमत तालुक्यातील गुंज येथील १० महिला व एक पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि. नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणण्यात आले होते. या सर्व महिला ट्रॅक्टर ट्रॉलीमधे बसून निघाल्या होत्या.

यावेळी आलेगाव शिवारात दोन शेतामध्ये असलेल्या चारी मधून ट्रॅक्टर वर घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ट्रॅक्टर विहीरीत कोसळला. या अपघातामध्ये आठ महिला ट्रॅाली खाली दबून दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ट्रॅक्टरचा चालक पळून गेला आहे. या घटनेत एक पुरुष व दोन महिला कशाबशा बाहेर आल्या. मात्र त्या बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत. घटनास्थळी लिंबगाव (जि. नांदेड) पोलिसांचे पथक दाखल झाले.

तर वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन बोराटे,मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, गुंजचे पोलिस पाटील अंकुश सुर्यवंशी यांच्यासह गावकरी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, विहीरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे आत ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत असून, विहीरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com