कन्नड - पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराच्या दरीत ट्रँक्टर कोसळुन झालेल्या अपघातातील गंभीररित्या जखमी झालेल्या भक्ती आप्पासाहेब राऊत (१४ रा. खामगाव) हिची मुत्युशी सुरु असलेली झुंज बुधवारी (ता.२०) रोजी सकाळी १० वाजता अपयशी ठरली. आणि भक्तीने अखेरचा श्वास घेत तीची जीवनज्योत मावळली.