Jintur News : पाण्यात बुडालेला बेपत्ता मच्छीमाराचा चौथ्या दिवशी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला
Fisherman Death : येलदरी धरणात मासेमारी करताना भुजंग राघोजी चव्हाण (वय ५८) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, चार दिवसांनी शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला.
जिंतूर : तालुक्यात येलदरी धरणाच्या जलाशयात बुधवारी (ता.१६) दुपारच्या सुमारास येलदरी येथील मच्छव्यवसायीक भुजंग राघोजी चव्हाण (अंदाजे ५८) यांचा मासेमारी करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. चार दिवसांनी शनिवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.