गेवराई - बीडमधील गेवराईच्या मालेगाव मज-यातील 'त्या' मायलेकीच्या मृत्यूचे कारण समोर आले असून, हुंड्यावरुन शारीरिक व मानसिक छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने तब्बल चोविस तासानंतर सासरकडील सहा जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरच या मायलेकीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालेगावात या मायलेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.