अत्यावश्यक सेवांची वाहतूक चालू राहणार  

District Office nanded.jpg
District Office nanded.jpg

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन दरम्यान शासनाच्‍या अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहूतकीस बंदी नसल्याची माहिती जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली. शुक्रवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रान्‍सपोर्टर्सच्‍या बैठकीत ते बोलत होते.  

ट्रान्सपोट्रर्सचे पदाधिकारी हजर
बैठकीला ट्रान्‍सपोट्रर्सचे जिल्‍हाध्‍यक्ष जाहेद भाई, जिल्‍हा मालक असोसिएशनचे अध्‍यक्ष सुखासिंग हुंडा, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाचे राहूल जाधव, जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती. डॉ. विपीन म्‍हणाले, अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहतूकीच्‍या अनुषंगाने वाहनांसाठी पासेस उपलब्‍ध करून देण्‍यासाठी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील कक्षात महसूल, पोलीस‍ विभाग, परिवहन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. अत्‍यावश्‍यक सुविधेसाठी पासेस‍ मिळण्‍याबाबत मागणी प्राप्‍त होताच पासेस निर्गमित करण्‍यात येतील. पासेसची प्रत वाहनाच्‍या समोरील भागात काचेच्‍या मधल्‍या बाजूने लावणे बंधनकारक राहील.

तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष 
तालुक्‍याच्‍या ठिकाणी महसूल व पोलीस विभाग यांचे नियंत्रण कक्ष उघडण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍याकडून अर्ज आल्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-मेलद्वारे कार्यालयाची मान्‍यता आल्‍यानंतर परवाना निर्गमित करावा. वाहतूकदारांनी collectoroffice09@gmail.com या ईमेलवर मागणी करावी. अत्‍यावश्‍यक वाहनांची ने-आण करावी. इतर बाबींची ने-आण केल्‍याचे आढळल्‍यास कडक कारवाई करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी बैठकीत सांगितले.


माथाडी कामगार व हमालाची घेणार मदत
अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहनांमध्‍ये माल चढविणे व उतरविणे या कामी माथाडी कामगार व हमालांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. संचारबंदी काळात या सेवेत व्‍यत्‍यय करू नये, म्‍हणून सहाययक आयुक्‍त कामगार व अध्‍यक्ष माथाडी कामगार युनियन यांना जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सूचना दिल्‍या. या कामगारांना ते ज्‍या ठिकाणी सेवा देणार आहेत ते ठिकाण नमूद करण्‍यात यावे. जिल्‍ह्यातील अत्‍यावश्‍यक सेवा घ्‍यावयाच्‍या सर्व ठिकाणी माथाडी कामगार यूनियन, हमाल यूनियन यांनी हमाल उपलब्‍ध करून द्यावेत. अडचण आल्‍यास जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांचेशी संपर्क साधावा.

गरिबांना धान्याच्या मदतीचे आवाहन
संचारबंदीच्‍या काळात कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये धान्‍यांची उलाढाल बंद असल्‍यामुळे ठोक विक्रेत्यांच्‍याकडे मालाची कमतरता जाणवू नये, म्‍हणून नोंदणीकृत आडती यांनी ग्रामीण भागात गाळे आपसात घेवून धान्‍यांचे अंतर राखून (सोशल डिस्‍टंन्‍स) खरेदी करावी. त्‍यानूसार ठोक विक्रेते अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या कृषी प्रक्रिया उद्योग याठिकाणी मालाच्या उपलब्‍धतेसाठी सहकार्य करावे. जिल्‍ह्यातील बेघर, अतिशय गरीब व गरजू व्‍यक्‍तींना मदत करण्‍यासाठी एमआयडीसी असोसिएशन व्‍यापारी व उत्‍पादक यांना मदतीचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. 

माथाडी असोसिएशनची बैठक
या कामात मदत देण्‍यासाठी सुसाह्य व्‍हावे म्‍हणून जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत पासेसचे वितरण करण्‍यात येणार आहे, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. यावेळी संचारबंदीच्‍या काळात माथाडी कामगार उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने एमआयडीसी असोसिएशन, उपनिबंधक अध्‍यक्ष, माथाडी असोसिएशन यांची बैठक घेण्‍यात आली.

वाहनांना वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण
कोरोना विषाणू संदर्भात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती संदर्भात अत्यावश्यक सेवा, वस्तु यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वाहतूक प्रमाणपत्र देण्यासाठी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवारपासून (ता. २८) कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्ष सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत कार्यान्वित राहील.

कक्षाचा ई-मेल आयडी

collectoroffice09@gmail.com असून जिल्ह्यातील वाहनधारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ईमेलवर अर्ज करता येईल. सोबत वाहनाचे आरसीबुक, फिटनेस प्रमाणपत्र, करपावती, वाहनांचा विमा, परमिट आदी वैध कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या वाहनासाठी वाहतूक प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तालुका स्तरावरसुद्धा तहसिल कार्यालयात वाहनधारकांना वाहतूक परवानगीसाठी अर्ज करु शकतील. याची नोंद जिल्ह्यातील वाहतूक संघटना व वाहनधारकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डा. विपीन यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com