esakal | धुळीवंदनासाठी ‘हा’ वृक्ष सज्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

हिंदीत पलाश, संस्कृतमध्ये त्रिपत्रक, मराठीत पळस तसंच अग्निशिखा, इंग्रजीत 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट',  लॅटिनमध्ये ब्युटिया मोनोस्पर्मा ही याची वेगवेगळ्या प्रांतातली नावे आहेत.

धुळीवंदनासाठी ‘हा’ वृक्ष सज्ज 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : 'पळसाला पानं तीन' अशी नागरी जीवनात पळस या झाडाची ओळख. हिंदीत पलाश, संस्कृतमध्ये त्रिपत्रक, मराठीत पळस तसंच अग्निशिखा, इंग्रजीत 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट',  लॅटिनमध्ये ब्युटिया मोनोस्पर्मा ही याची वेगवेगळ्या प्रांतातली नावे आहेत.
 
महाराष्ट्रात पळसाचा आणि शेतकऱ्याचा फार जवळचा संबंध आहे. शेतावर झोपडी शाकारण्यासाठी, दोरखंडासाठी पळसाच्या सालीचा आणि मुळाचा उपयोग केला जातो. तसेच लग्नाच्या पंगतीतल्या पत्रावळी, तर पोळ्याच्या पूर्वसंध्येला पळसाच्या पानांनीच बैलांचा खांदा शेकला जातो. पळसाची गर्द केशरी फुलं आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. या केशरी फुलांचा उपयोग रंग बनवण्यासाठीही केला जातो. आजही मेळघाटातील आदिवासी लोक होळीमधील रंगांसाठी या फुलांचाच वापर करतात. ही फुलं उमललीत की उन्हाळ्याची चाहूल लागते. तर माळरानही सजलेलं असतं ते केवळ याच अग्निशिखांनी.

हेही वाचानांदेडला ‘एवढ्या’ कोटींचा खरीप पिकविमा मंजूर

पर्यावरण प्रेमी मीत्रांना विनंती की यावर्षीची 

खेळुया ती पळस फुलांच्या रंगानी .. 
बंजारा भाषेत पळसाला ढाकडा र झाड ..
तर फुलाला केसुला र फुल असे म्हणतात. तेही या फुलांचा रंग तयार करूण होळी खेळतात.
अशी माहीती बंजारा समाजाच्या जेष्ठ हस्तशिल्पकार श्रीमती मुक्ताबाई पवार, रामदास तांडा, ता. लोहा  यांनी हे फोटो पाहुन माहीती दिली. रंगपंचमी नंतर याचा रंग फीका पडतो. हा बहारा फक्त शिमग्या पस्तुर दिसुन येतो असे ही त्या म्हणाल्या.

पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक

नांदेड : फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला वजिराबाद पोलिसांनी शनिवारी (ता. २९) सायंकाळी अटक केली. त्याला यापूर्वी न्यायालयाने फरार घेषीत केले होते. 

नांदेड तहसिल कार्यालयात अव्वल कारकुन ज्ञानप्रसन्ना भुमन्ना चिलकावार (वय ३८) यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात ता. २२ मे २०१५ रोजी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाला तेंव्हापासून तो फरार होता. त्याच्या विरोधात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद झोटे यांनी या प्रकरणात न्यायालयात ता. नऊ मार्च २०१६ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावरून न्यायालयाने सीआरपीसी प्रमाणे आरोपीला फरार घोषीत केले होते. 

येथे क्लिक कराघृणास्पद : बालगृहातील युवतीवर अत्याचार

वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई

या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या. पथक प्रमुख सुनील पुंगळे यांनी गुप्त माहिती काढून पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली. 

loading image