वृक्षलागवडीचा कागदोपत्री खेळ 

महेश गायकवाड
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

जालना - शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत रोपांची लागवड न करता कागदोपत्री उद्दिष्ट साधण्याचा खेळ क्रीडा अधिकारी कार्यालयाने केल्याचे समोर आले आहे. या कार्यालयाला वृक्षलागवडीसाठी दिलेल्या रोपांची लागवड न करता परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. रोपणाविना रोपे पडून, अनेक सडली, सुकली आहेत. नुसते प्लास्टिक पन्नीचे अवशेषही मागे उरले आहेत. 

जालना - शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत रोपांची लागवड न करता कागदोपत्री उद्दिष्ट साधण्याचा खेळ क्रीडा अधिकारी कार्यालयाने केल्याचे समोर आले आहे. या कार्यालयाला वृक्षलागवडीसाठी दिलेल्या रोपांची लागवड न करता परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. रोपणाविना रोपे पडून, अनेक सडली, सुकली आहेत. नुसते प्लास्टिक पन्नीचे अवशेषही मागे उरले आहेत. 

शासनाच्या पन्नास कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत यंदा राज्यभरात जून ते सप्टेंबरदरम्यान 33 कोटी रोपलागवड मोहीम राबविण्यात आली. या माहिमेअंतंर्गत जालना जिल्ह्यातील विविध विभागांना 64 लाख 84 हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा जिल्ह्यात 112 टक्के वृक्षलागवड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील क्रीडा विभागाला 15 हजारांचे उद्दिष्ट होते. तेवढ्या रोपांचा पुरवठा वनविभागातर्फे करण्यात आला होता; मात्र या विभागातर्फे कागदोपत्री या रोपांची लागवड केल्याचे समोर आले आहे. लागवडीसाठी दिलेली हजारो रोपे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या कोपऱ्यात फेकण्यात आली आहे. यातील काही रोपे जिवंत आहेत. तर काही सडून गेली आहेत. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या परिसरात रोपांच्या काळ्या रंगाच्या पन्न्यांचा ढीग साचलेला आहे. 

हेही वाचा : मंगळसूत्र घेऊन विद्यार्थी पोचले ठाण्यात 

देखभाल, दुरुस्तीसाठी एक लाखाची मागणी 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा संकुल परिसरात दहा हजार रोपे लावल्याचा दावा केलेला आहे. या रोपांची देखभाल करण्यासाठी एक कर्मचारी व आवश्‍यक कामांसाठी जवळपास एक लाखाची मागणी वरिष्ठ कार्यालयाला केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र रोपे आता लागवडीयोग्यही राहिलेली नाहीत. 

क्रीडा विभागासाठी प्राप्त रोपांची जिल्ह्यातील तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयांना रोपांचे वाटप केले. यात रोपलागवड करण्यात आली आहे; तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात काही रोपांची लागवड करण्यात आली आहे. 
- प्रमोदिनी अमृतवाड, 
जिल्हा क्रीडा अधिकारी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree without planting in Jalna