

Tribal Farmer's House Gutted: Massive Fire Destroys Everything in Jogwada Village
Sakal
जिंतूर : तालुक्यातील जोगवाडा येथील गट क्रमांक ५६ मध्ये राहणारे आदिवासी शेतकरी मारोती देवबा वाळके यांच्या शेतातील घराला शनिवारी (ता.०२)रात्री भीषण आग लागून संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा,रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या दुर्दैवी घटनेमुळे वाळके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.