container bike accident
sakal
पाचोड - छत्रपती संभाजी नगरकडे येणाऱ्या दोन दुचाकींना पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कंटनेरने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घटना सोमवारी (ता. सहा) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा (ता. अंबड) जवळ घडली असून जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केले तर मृतांना पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरणीय तपासणी साठी आणण्यात आले.