
अर्धापूर : अर्धापूर पुर्व वळण रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात चालत्या ट्रकला आगा लागल्याची घटना सोमवारी (ता तीन) दुपारी झाली आहे.. ट्रकला लागलेल्या आगीला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.या आगित सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला.