Video : माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील माजलगाव ते परभणी महामार्गावर उसाच्या ट्रकने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. 13) घडली.

माजलगाव (जि. बीड) - माजलगाव ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या घळाटवाडी फाट्यावर ऊस भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रक जागेवरच जळुन खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 13) घडली.

पाथरी तालुक्‍यातील बाभळगाव या गावातुन ऊस घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील एस. पी. शुगर तडवळी या कारखान्यास घेऊन जात असताना ट्रक (एम. एच. 13 आर. 2231) शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील घळाटवाडी फाट्याजवळ आला असता ट्रकच्या गिअर बॉक्‍समधुन अचानक धुर निघत असल्याचे चालक सीताराम महादेव हजारे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ट्रक थांबवून बाहेर उडी घेतली.

भर रस्त्यावर ट्रकने अचानक मोठा पेट घेतला. या आगीत ट्रक पूर्णतः जळाला आहे. दरम्यान, आग विझविण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकातील अनिल भिसे, सतीश क्षीरसागर, समीर शेख, अनिल खंडागळे यांनी प्रयत्न केले.

 

हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck exploded in Majalgaon