esakal | Osmanabad : भाविकांसाठी सात ऑक्टोबरपासून खुले होणार तुळजाभवानी मंदिर
sakal

बोलून बातमी शोधा

osmanbad

भाविकांसाठी सात ऑक्टोबरपासून खुले होणार तुळजाभवानी मंदिर

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर ( जि. उस्मानाबाद) : तुळजा भवानी मंदिर भाविकांसाठी येत्या 7 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या प्रशासनाने शुक्रवारी (ता.1) सायंकाळी दिली.

यासंदर्भात तुळजा भवानी मंदीर समितीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पुजारी , सेवेधारी यांना 7 ऑक्टोबर ला सायंकाळी सहा वाजल्यापासून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. सोबत पुजार्यांनी ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे. तुळजा भवानी मंदिरात भाविकांचे गाभारा आणि मंदिर परीसरात कोणतेही कुलाचार, विधी , करता येणार नाहीत. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दुध॔र आजारग्रस्त व्यक्ती , गरोदर स्त्रियांना तसेच 10 वर्षाखालील बालकांना मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही.

मंदीर प्रवेशावेळी मास्क घालणे अनिवार्य आहे. भाविकांना 6 ऑक्टोबर 2021 पासून प्रवेश पाससाठी नोंदणी करता येणार आहे. तुळजा भवानी मंदीरात पुजार्यांना ड्रेस कोड मध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच तुळजा भवानी मातेची कोजागिरी पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. त्यादिवशी महंत, पुजारी, सेवेधारी, मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व धार्मिक विधी परंपरेने पार पडणार आहेत. तुळजा भवानी मंदिर समितीच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी यासंदर्भात वरील माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

नारळ व तेल विक्रीस बंद

भाविकांच्या सुरक्षेसाठी 21 ऑक्टोबर 2021 पर्यत मंदीराच्या 200 मीटर परीसरात सोललेले नारळ आणि सुट्टे तेल विक्री करण्यास बंदी राहणार आहे.

loading image
go to top