esakal | तुळजाभवानी मातेच्या नवरात्रास गुरूवारपासून होणार प्रारंभ | Tuljabhavan Mata Navaratra
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजाभवानी माता

तुळजाभवानी मातेच्या नवरात्रास गुरूवारपासून होणार प्रारंभ

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या (Tuljabhavani Mata) नवरात्रास येत्या गुरूवारपासून (ता.सात) प्रारंभ होणार आहे. दुपारी बारा वाजता घटस्थापना मंदिरात होणार आहे. तुळजाभवानी मातेच्या नवरात्राच्या (Navratra Ustav) निमित्ताने विविध धार्मिक विधी परंपरेने होणार आहेत. गुरूवारी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठाना होणार आहे. दुपारी बारा वाजता मंदिरात घटस्थापना होणार आहे तसेच रात्री छबिना होणार आहे. शुक्रवारी (ता.आठ) तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा व रात्री छबिना, शनिवारी (ता.नऊ) तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा (Tuljapur) व रात्री छबिना, रविवारी (ता.दहा) तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा, रथ अलंकार महापुजा, मुरली अलंकार महापुजा तसेच रात्री छबिना, सोमवारी (ता.११) तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबिना, मंगळवारी (ता.१२) तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबिना, बुधवारी (ता.१३) महिषासुरमरदिनी अलंकार महापुजा, दुर्गाष्टमी, दुपारी तीन वाजता वैदिक होमास प्रारंभ , रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पूर्णाहुती व रात्री छबिना, गुरुवारी (ता.१४) तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा, दुपारी बारा वाजता होमावर (Osmanabad) धार्मिक विधी, घटोत्थापन होईल.

हेही वाचा: महाविकास आघाडीला धक्का,सुभाष साबणे उद्या भाजपात करणार प्रवेश

रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक, शुक्रवारी (ता.१५) विजयादशमी, तुळजाभवानी मातेचे शिबिकारोहण, सिमोल्लंघन, देवीची मंचकी निद्रा, ता.19 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा, ता.20 ऑक्टोबर च्या पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापणा, रात्री तुळजाभवानी मातेची पौर्णिमा, सोलापूरच्या काठ्यासह छबिना, जोगवा आदीसह धार्मिक विधी नवरात्र महोत्सवात पार पडणार आहेत.

loading image
go to top