esakal | महाविकास आघाडीला धक्का,सुभाष साबणे उद्या भाजपात करणार प्रवेश | Deglur Bypoll Subhash Sabane
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार सुभाष साबणे

महाविकास आघाडीला धक्का,सुभाष साबणे उद्या भाजपात करणार प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर (जि.नांदेड) : गेल्या चाळीस वर्षांपासून साधा शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ता ते तालिका सभापती, विधानसभेचे तीनदा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सुभाष पिराजी साबणे (Subhash Sabane) हे भाजपात प्रवेश करण्यापूर्वीच भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Bypoll) त्यांची उमेदवारी रविवारी (ता.तीन) अधिकृतरित्या जाहीर करून एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. मी ज्या पक्षात वाढलो, घडलो, त्या पक्षाबद्दल अथवा पक्षप्रमुखाबद्दल माझ्या मनात किंचितही द्वेष नसून केवळ जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला इतरत्र घरोबा करावा लागल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष साबणे यांनी बोलल्याचे पुढे येत आहे. दरम्यान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबईचे पक्ष अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सोमवार (ता.चार) भाजपचा एक मेळावा येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यातच माजी आमदार साबणे हे आपल्या समर्थकांसह पक्षात प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: शिवसेनेला जबरी धक्का; सुभाष साबणेंना भाजपकडून उमेदवारी

हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठी तयारी सुरू असून इतरही पक्षातील कार्यकर्ते यावेळी पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. साबणे यांच्या शिवसेना सोडण्याच्या पार्श्वभूमीला गेल्या अनेक वर्षापासूनची झालर असून चोहोबाजूने जिल्हा नेतृत्वाने त्यांची कोंडी केली होती. हा सर्व प्रकार सेनेच्या अंतिम नेतृत्वापर्यंतही गेला होता. मात्र राज्यात आघाडी सरकार असल्याने या प्रकरणाकडे कोणीही गांभीर्याने बघितले नसल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेचा एक साधा कार्यकर्ता शाखाप्रमुख शहरप्रमुख तालुकाप्रमुख त्यानंतर थेट विधानसभेत प्रवेश पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभेची संधी मिळाल्यानंतर मुखेड राखीव मतदारसंघ संपुष्टात आला व त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यात देगलूर मतदारसंघ नव्याने निर्माण झाला व तो राखीव झाला. त्यावेळी सुभाष साबणे यांनी देगलूरमध्ये निवडणूक लढवली. पहिल्यांदा त्यांना अपयश आले. मात्र दुसऱ्यांदा त्यांनी थेट विधानसभेत प्रवेश करून राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे तालिका सभापतीपदही सांभाळले. यावेळी मतदारसंघातील अनेक मोठे कामे मार्गी लागले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत प्रस्थापित लोकप्रतिनिधींकडून त्यांची कोंडी करत त्यांचा पराभव करण्यात आल्याचा थेट आरोप विधानसभेचे संघटक अवधूत भारती महाराज यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांच्या सुनबाईंना उपाध्यक्षपदाची संधी आघाडीच्या सुत्रानुसार वाट्याला आलेली असतानाही जिल्हा नेतृत्वाने जाणीवपूर्वक त्यांना त्या पदापासून दूर लाेटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. वेळोवेळी समाजकारण, राजकारण करत असताना जिल्हा नेतृत्वाने वरून आघाडी आतून बिघाडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला.

हेही वाचा: शाहरुखचा आर्यन कसा अडकला? उद्योगपतींच्या मुलांचीही नावं

त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने नाईलाजास्तव मुख्य प्रवाहात येण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता. त्यामुळे मी भाजपात जात असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष साबणे यांनी यावेळी बोलताना दिली. पक्ष प्रवेश यापूर्वीच थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवणारे माजी आमदार सुभाष साबणे हे देशातील पहिलेच उदाहरण मानले जात आहे. तर काहींच्या मते ते गेल्या चार महिन्यांपूर्वीच ठरल्याप्रमाणे गेम केला गेला, अशी चर्चाही या प्रवेश साेहळ्यावरून मतदारसंघात चर्चिली जात असून आता काँग्रेसचे उमेदवार अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव अभियंता जितेश अंतापूरकर हेच असतील तर भाजपचे उमेदवार म्हणून माजी आमदार सुभाष साबणे या दोघांतच अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वंचित आघाडीतर्फे डॉ .उत्तमराव इंगोले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मांनली जात आहे.

loading image
go to top