

Bribery Case
sakal
तुळजापूर : एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठाकडे लाच मागितली, खंडणीची मागणी केली, अशा बातम्या वाचनात येतात; पण चक्क मंडळ अधिकाऱ्याने थेट तहसीलदाराला खंडणी मागितल्याचा प्रकार तुळजापुरात घडला. यात तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदारांना तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंडळ अधिकारी तसेच विधिज्ञावर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.