

Heartbreaking Reality of Drought in Tuljapur Shared with Aaditya Thackeray
Sakal
तुळजापूर : ‘‘साहेब, दुष्काळानं पीक करपलं हो. माझ्या शेतातनं कसलंच उत्पन्न नाही. ऊस आहे, पण पाणी मिळत नाही. लाइट येत-जात असल्यानं पिकाला पाणी देता येत नाही. मी निराश झालो. म्हणून मी एकदा हतबल होऊन घरात बोलत होतो. आत्महत्या करू का, असं मी तेव्हा बोलून गेलो. तेव्हापासनं माझा मुलगा मला कुठंच एकटं जाऊ देत नाही. माझ्या काळजीपोटी तो शाळेतही जात नाही, म्हणून मला त्याच्यासोबत जाऊन वर्गाच्या बाहेर बसावं लागतं...’’