
तुळजाभवानी पुजारी मंडळ पुजाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय विमा दिला जाणार आहे, अशी माहिती तुळजा भवानी पुजारी मंडळाने रविवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत दिली.
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी पुजारी मंडळ पुजाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय विमा दिला जाणार आहे, अशी माहिती तुळजा भवानी पुजारी मंडळाने रविवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, प्रा. धनंजय लोंढे, किरण ऊर्फ बाबा क्षीरसागर उपस्थित होते. यासंदर्भात श्री. साळुंके यांनी सांगितले, ‘‘तुळजाभवानी पुजारी मंडळाची बैठक शनिवारी (ता.१२) झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. यात पुजाऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मंडळातर्फे मोफत वैद्यकीय विमा दिला जाणार आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
कमाशीच्या पुजाऱ्याला २५१ रुपये मानधन
तुळजाभवानी पुजारी मंडळाचा एक सदस्य देवी मंदिरात ठरावीक दिवशी देवीच्या डाव्या बाजूस उभा राहतो. त्यास कमाशीची पाळी असे म्हटले जाते. साधारणपणे दिवसभरात सहा पुजारी कमाशीच्या पाळीला जातात. त्या सर्वांना एक दिवसाचे २५१ रुपये मानधन देण्याचा निर्णय पुजारी मंडळाने घेतला आहे. ज्या पुजाऱ्यांना मानधन घ्यायचे नाही त्यांनी ऐच्छिकपणे सेवा करावी. तथापि, मानधनाची सोय पुजारी मंडळाने केली आहे.
संपादन - गणेश पिटेकर