

Wedding Season
sakal
धाराशिव : भारतीय परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर विवाहाचे मुहूर्त सुरू होतात. त्यानुसार, येत्या २ नोव्हेंबरच्या तुळशी विवाहापासून लग्न समारंभांना सुरवात होणार आहे. जुलै २०२६ पर्यंत एकूण ५५ विवाह मुहूर्त असले तरी यंदा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने लग्नसराईच्या हंगामात मोठी घट झाली आहे.