हिंगोली : ‘एनसीडीईएक्स’ (नॅशनल कमोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्हज् एक्सचेंज)च्या गोदामांमध्ये कमी गुणवत्तेच्या हळदीची भेसळ वाढल्याने आणि दरामध्ये सातत्याने कृत्रिम चढ-उतार होत असल्याने वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. .यामुळे हिंगोली आणि वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीची खरेदी-विक्री बंद झाली. परिणामी, गेल्या तीन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. हिंगोली जिल्हा राज्यातील प्रमुख हळद उत्पादक जिल्हा असून, सांगलीनंतर सर्वाधिक हळद उत्पादन येथे घेतले जाते..हिंगोलीतील संत नामदेव मार्केट यार्ड महाराष्ट्रातील हळदीसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथून देश-विदेशात हळद पाठवली जाते. दररोज या बाजारात किमान १० ते १२ कोटी रुपयांची हळद विक्री होते. त्यानंतर वसमत बाजारपेठेतील हळदीची उलाढालही दररोज सुमारे ५ ते ७ कोटी रुपयांपर्यंत जाते. .गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या व्यापारात वायदे बाजाराचा हस्तक्षेप वाढल्याने लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वायदे बाजारात सट्टेबाज शिरल्याने कमी दर्जाची हळद बाजारात आणली जात आहे, तसेच कृत्रिमरीत्या दरांमध्ये चढ-उतार केले जात असल्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर, हिंगोली आणि वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांनी संचालक मंडळाला पत्र पाठवून वायदे बाजार बंद करण्याची किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. त्यामुळे २० ऑगस्टपासून हळदीची खरेदी-विक्री थांबवण्यात आली..हिंगोलीत दोन दिवसांत २० कोटींची उलाढाल ठप्पहिंगोली येथील मार्केट यार्डमध्ये दररोज १२ ते १३ कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, गेले दोन दिवस मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवार मिळून अंदाजे २० ते २२ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. वसमत बाजार समितीत देखील दोन दिवसांत सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.. वायदे बाजारामुळे शेतकऱ्यांसोबत लहान व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. त्याचा परिणाम बाजार समितीवरही होत आहे. म्हणून आम्ही पत्राद्वारे वायदे बाजार बंद करण्याची मागणी केली. केवळ दोन दिवसांत आमची १३ ते १४ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.- तानाजी बेंडे, सभापती, वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती.Hingoli Festival: बैलाचं लग्न लावून पोळा; हिंगोली येथील कनेरगाव येथे २६ वर्षांची परंपरा . मला हळद विक्री करायची होती. परंतु, गेले दोन दिवस हळद विक्रीचे मार्केट बंद आहे. भावामध्येही चढ-उतार होत असल्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत. त्यामुळे लवकरच वायदे बाजाराचा प्रश्न मिटवावा आणि मार्केट पुन्हा सुरू करावे.- भगवान भोसले, शेतकरी, आंबा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.