बारावी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरण्याची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची धांदल
परीक्षेचा फॉर्म भरण्याची लगबग

जालना : बारावी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरण्याची लगबग

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या २०२२ मधील दहावी- बारावी बोर्ड परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. शाळा कनिष्ठ महाविद्यालयात आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याची लगबग दिसून येत आहे. राज्य मंडळातर्फे दहावी- बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. राज्य मंडळाने याबाबत माध्यमिक शाळांना आदेश जारी केले असून दहावी- बारावी प्रमाणपत्र परीक्षा मार्च दरम्यान २०२२ मध्ये घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आवेदनपत्र शाळेकडे ता.१८ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत भरावीत,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमित विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत आवेदनपत्र भरावी यासह शाळांनी ता.३० डिसेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन भरलेली दहावीची आवेदनपत्र चलनासह विभागीय मंडळाकडे ता.४ जानेवारीस याद्यांसह जमा करावेत असेही राज्य मंडळाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा: ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

बारावी विद्यार्थ्याची आवेदनपत्र माहिती चलनासह ता.२ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी सरल प्रणालीत भरलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरली जाणार असल्याचे राज्य मंडळाने कळविले आहे. दरम्यान दहावी- बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याची शाळा- कनिष्ठ महाविद्यालयात लगबग दिसून येत आहे. आवेदनपत्र भरताना विद्यार्थी बँक खाते क्रमांक द्यावा लागणार आहे. असे असले तरी अनेक विद्यार्थ्याचे खाते नसल्याने पालकांचा खाते क्रमांक दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरून दिल्यानंतरच संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना सदर आवेदनपत्र मंडळाच्या साइटवर ऑनलाइन भरावे लागतात.

"राज्य मंडळाने बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची मुदत दिलेली आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरु आहे."

- गणेश आघाव प्राचार्य, विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी

loading image
go to top