ऑपरेशनसाठी वडिल रुग्णालयात, बारावीतील विद्यार्थिनीची राहत्या घरी आत्महत्या

शारदा ही बारावीत शिकत होती. घटनेच्या वेळी सहा वर्षांचा भाव तिच्यासोबत होता.
committed suicide
committed suicidesakal

सेलू (जि.परभणी) : शहरातील पारीख काॅलनी येथील बारावीत (HSC) शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनी शारदा कैलास कल्याणी हिने ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१२) सकाळी अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस नायक मधुकर जाधव, पोलीस नाईक बालासाहेब लिंगायत यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी घटनास्थळावरून या तरुणीचा मृतदेह हलवण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, शहरातील (Selu) पारीख कॉलनी येथील शारदा कैलास कल्याणी (वय १८) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने बुधवारी राहत्या घरी सकाळी अकराच्या सुमारास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Twelve Class Girl Hanged Herself In Selu Of Parbhani)

committed suicide
दलित असल्याने घर नाकारले; औरंगाबादेत धक्कादायक प्रकार,पाच जणांवर गुन्हा दाखल

यावेळी तिचा सहा वर्षांचा भाऊ घरामध्ये सोबत होता. झालेल्या घटनेची शेजाऱ्यांना या मुलानेच माहिती दिली. दरम्यान काही तरुणांनी तिला प्रथम खासगी व नंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. मुलीचे वडील कैलास कल्याणी यांच्या डोळ्यावर आजच परभणी (Parbhani) येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे मुलीची आई देखील त्यांच्यासोबत होती. मृत्युचे नेमके कारण मात्र समजु शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com