esakal | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी १२ जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी १२ जणांना अटक

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : तालुक्यातील (Vasmat) कनेरगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार (Crime Against Minor Girl) प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता.२०) रात्री १२ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर एका फरार आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे. तालुक्यातील कनेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Hingoli) केल्या प्रकरणात मुलीच्या पुरवणी जबाबानंतर १३ जणांची नावे आरोपींमध्ये समाविष्ठ केली आहेत. तर एक जण अल्पवयीन आहे. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने बारा जणांना अटक केली आहे.(twelve people arrested in misbehave with minor girl in vasmat of hingoli district glp88)

हेही वाचा: नांदेडमध्ये गोळ्या झाडून तरुणाचा खून, आरोपींवर गुन्हे दाखल

यामध्ये दत्ता संभाजी कदम (रा. वाई), बालाजी मारोती जगताप, आनंद उमाकांत आवटे, रामा क्षीरसागर सचिन विठ्ठल थोरात, अंकूश विठ्ठल थोरात, गोरखनाथ विठ्ठल थोरात, लक्ष्मण गजानन गायकवाड, (सर्व रा.कनेरगाव) मदन उर्फ मधुकर निवृत्ती कठाळे, (रा. शिरला), रवी सुरेश भालेराव (अर्धापूर), सुनील शिवाजी कोल्हे (रा. वापटी) यांचा समावेश आहे. तर फरार आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीमध्ये आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

loading image