esakal | नांदेडमध्ये गोळ्या झाडून तरुणाचा खून, आरोपींवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

विक्की ठाकूर

नांदेडमध्ये गोळ्या झाडून तरुणाचा खून, आरोपींवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : जुन्या नांदेडमधील (Nanded) गाडीपुरा भागात मंगळवारी (ता.२०) रात्री साडेसातच्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर (वय ३२) याचा गोळ्या घालून खून करण्यात आल्यानंतर या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात दोन महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची (Crime In Nanded) तीन पथके विविध भागात पाठविण्यात आली आहेत. गाडीपुरा भागातील ममता पान ते गजेंद्र ठाकूर यांच्या घराच्या दरम्यान विक्की ठाकूर याचा दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी गोळ्या झाडून खून केला. तो खाली पडल्यावर त्याच्या शरीरावर तलवारीनेही वार केले आणि मारेकरी पळून गेले. त्यावेळी विक्की ठाकूरसोबत सुरज खिराडे (वय २९, रा.असर्जन) हा युवक होता. आपल्या मित्रावर झालेला हल्ला पाहून तो गल्लीबोळाने पळाला आणि पळता-पळता अनेक ठिकाणी पडून जखमी झाला. त्याने या घटनेची तक्रार इतवारा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार दोन महिला आणि इतर पाच जण दोन दुचाकीवर आले होते आणि त्यांनी दोन बंदुकातून विक्की ठाकूरवर हल्ला केला.(youth killed in firing in nanded glp 88)

हेही वाचा: जनावरे चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, परभणीत कारवाई

या तक्रारीनुसार इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार नितीन जगदीश बिघानीया, दिगंबर काकडे, मुंजाजी उर्फ गब्या धोंगडे, लक्की मोरे पाटील, गंगाधर अशोक भोकरे, कैलास जगदीश बिघानीया, अंजली नितीन बिघानीया, नितीन बिघानीयाची बहिण ज्योती बिघानीया अशा आठ जणांची नावे त्यात आहेत. या आठ जणांपैकी कैलास जगदीश बिघानीया हा सध्या विक्की चव्हाण खून प्रकरणात तुरूंगात आहे. प्राप्त माहितीनुसार टेलिफोनवरील बोलणे, त्याचे रेकॉर्डींग या आधारावर विक्की ठाकूरचा खून करण्यात महिलांचा पण कटात सहभाग असल्याचे दिसते. कैलास बिघानीयाने तुरूंगात राहुन या खूनाचे खलबत रचल्याची पोलिसांना शंका आहे. ऑगस्ट २०२० मध्ये विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणचा खून करण्यात आला होता. कैलास बिघानीयासह जवळपास बारा जण विक्की चव्हाणच्या खून प्रकरणात सध्या तुरूंगात आहेत. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आपल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तीन पथके विविध गावांना पाठवली आहेत.

loading image