उमरगा, (जि. धाराशिव) - शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका २३ वर्षीय बेपत्ता तरूणाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी धागादोरा शोधुन दोन तरूणांना अटक केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, शहरातील मुन्शी प्लॉट येथील अभिषेक कालिदास शिंदे या बेपत्ता तरुणाचा मृतदेह २५ जुलैला शहराच्या बाह्यवळण रस्त्यालगतच्या अंकुश शिंदे यांच्या शेताजवळील नाल्यात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी प्रारंभी पोलिसांनी कालिदास शिंदे यांचा जबाब घेऊन आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.