esakal | उदगीरसह तालुक्यात पुन्हा पावसाला सुरवात, वीज पडून दोन जनावरे दगावली
sakal

बोलून बातमी शोधा

0rainsong

उदगीर शहर व परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१५) रात्री समाधानकारक पाऊस झाला आहे. कासराळ (ता.उदगीर) येथे वीज पडून म्हैस व वासरू दगावले असुन मोघा मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उदगीरसह तालुक्यात पुन्हा पावसाला सुरवात, वीज पडून दोन जनावरे दगावली

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : उदगीर शहर व परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१५) रात्री समाधानकारक पाऊस झाला आहे. कासराळ (ता.उदगीर) येथे वीज पडून म्हैस व वासरू दगावले असुन मोघा मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोगा महसूल मंडळातील तोगरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. गावातून जात असलेल्या नाल्यातून जास्त प्रमाणात पाणी वाहिले आहे.

अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रकार घडला आहे. शिवाय शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी (ता.१६) सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी रात्री परिसरातील आठ महसूल मंडळात पाऊस झाला आहे. अनेक गावातील नदी, नाले व ओढे वाहिल्याने पाझर तलाव, साठवण तलावातील पाणी पातळी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.

छत्रपती उदयनराजेंनीच नेतृत्व करावे, मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंनी केले आवाहन

मात्र काढणीला आलेल्या सोयाबीन व उडीदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचा कणा मोडला असून महामारी, टाळेबंदीशी मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे. सध्या शेतीची कामे ठप्प झाल्याने मजूर वर्गांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

मराठवाड्यातील विद्यार्थ्‍यांचे होतेय ‘सैन्य’ क्षेत्राकडे दुर्लक्ष, जाणून घ्या...

मंगळवारी झालेल्या पावसाची मंडळनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे कंसातील आकडे एकूण पाऊस दर्शवतात. उदगीर ५८ (८१५), नागलगाव ६५ (६१२), मोघा १५५ (८७८), हेर ३३ (५९५), वाढवणा १७ (८७२), नळगीर २० (६९९), देवर्जन ४१ (५२९), तोंडार ४१ (६२३) असे एकून पर्जन्य ४३० मिमी तर एकूण सरासरी पर्जन्य ५४ मिमी झाल्याची नोंद झाली आहे.

संपादन - गणेश पिटेकर