जालना एसआरपीएफच्या दोन कंपन्या मालेगावात 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.
Updated on

जालना -  येथील एसआरपीएफच्या दोन कंपन्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेल्या असून त्यात एकूण सहा अधिकारी १८० जवान आहेत. या दोन कंपन्यांपैकी फिक्स पॉइंट बंदोबस्तासाठी असलेल्या सी कंपनीचे २३ जवान व मालेगाव येथून हिंगोली येथे गेलेला एक जवान कोरोनाबाधित झाला आहे. दरम्यान कोरोबाधित झालेल्यांपैकी १७ जवानांना पुढील उपचासाठी नाशिक येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती एसआरपीएफकडून देण्यात आली आहे. 

मालेगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मालेगाव येथे जालना येथील एसआरपीएफच्या दोन कंपन्या बंदोबस्तकामी गेलेल्या आहेत. यात एसआरपीएफची सी कंपनी ही ता.पाच एप्रिल रोजी दोन महिन्यांपासून बंदोबस्तावर असलेल्या हिंगोलीच्या एसआरपीएफच्या कंपनीला बंदोबस्तातून रिलीफ करण्यासाठी मालेगाव येथे गेली होती. या कंपनीत तीन अधिकारी आणि ९० जवान आहेत.

एसआरपीएफची ही सी कंपनी फिक्स पॉइंट बंदोबस्तासाठी मालेगाव येथे तैनात आहे. या सी कंपनीमधील २३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, मालेगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कंपनीमधील एक जवानाला रजा मिळाल्याने तो अन्य जवानांसह हिंगोली येथे गेला होता. तोही कोरोनाबाधित असून त्याच्यावर हिंगोली येथे उपचार सुरू आहेत.

जालना एसआरपीएफची दुसरी बी कंपनी ही कायदा आणि सुव्यवस्था बंदोबस्तासाठी ता. १९ एप्रिल रोजी मालेगाव येथे गेली आहे. यात तीन अधिकारी आणि ९० जवान आहेत. 

मालेगाव येथे बंदोबस्त कामी जालना एसआरपीएफच्या दोन कंपन्या गेल्या आहेत. त्यातील सी कंपनीचे २४ जणांना कोरोनाबाधित झाले असून, २३ जणांवर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. तर एका जवानाचे लग्न असल्याने त्याची रजा मंजूर झाली होती. तो हिंगोलीच्या एसआरपीएफच्या जवानांसह हिंगोली येथे गेला होता. तो कोरोनाबाधित आढळला असून त्याच्यावर हिंगोली येथे उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित झालेल्या जवानांपैकी १७ जवानांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येणार आहे. 
-गोविंद निजलेवार, असिस्टंट कंमाडंट, एसआरपीएफ, जालना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com