बीड जिल्ह्यात उज्ज्वला गॅसधारकांना दोन सिलिंडर मोफत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

उज्ज्वला गॅसधारकांना येणाऱ्या मे व जून या महिन्यांसाठी दोन गॅस सिलिंडर मोफत असून गॅस सिलिंडरची किंमत दरमहा गॅसधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

बीड - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक) मोफत मिळणार आहे.

उज्ज्वला गॅसधारकांना येणाऱ्या मे व जून या महिन्यांसाठी दोन गॅस सिलिंडर मोफत असून गॅस सिलिंडरची किंमत दरमहा गॅसधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल यांनी दिली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करावे लागल्याने सामान्यांसमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले. यात दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वस्त आणि काही घटकांना मोफतही धान्य उपलब्ध करून दिले. आता तूरडाळ व चणाडाळ ही शासकीय गोदाम देवगिरी कॉलेज रोड, उस्मानपुरा, औरंगाबाद येथून उपलब्ध होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणाच्या शासकीय गोदामामध्ये मंजूर नियतनाप्रमाणे ही डाळ पोहोच करण्यात येणार आहे.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

मे व जून महिन्यांसाठी चणाडाळीचे नियतनही मंजूर केल्याची माहिती राहुल रेखावार यांनी दिली. यानुसार अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी, एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी आणि उर्वरित केसरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी परिमाण प्रत्येक महिन्यासाठी नियतन मंजूर करून पोहोचविण्यात येत आहे. यामुळे गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two cylinders free to Ujjwala gas holders in Beed district