परभणी जिल्ह्यात कोरोनामुळे दोन वृध्दांचा मृत्यु

प्रल्हाद कांबळे
Saturday, 18 July 2020

शनिवारी (ता. १८) जिल्ह्यातील परभणी व गंगाखेड येथे उपचार घेणाऱ्या दोन वृध्द रुग्णांचा कोरोना विषाणु संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. यात गंगाखेड शहरातील रहिवाशी असलेल्या ५५ वर्षीय वृध्द रुग्णांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यु झाला.

परभणी ः कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या दोन वृध्द रुग्णांचा शनिवारी (ता. १८) सकाळी मृत्यु झाला आहे. या दोन्ही रुग्णांना इतरही आजार होते अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता तीनशेच्या पार गेला आहे. परभणी तालुका व गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या समोर आली आहे. गंगाखेड शहरात झालेल्या एका स्वागत समारंभात कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आयोजक यांच्यासह इतरांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी (ता. १८) जिल्ह्यातील परभणी व गंगाखेड येथे उपचार घेणाऱ्या दोन वृध्द रुग्णांचा कोरोना विषाणु संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. यात गंगाखेड शहरातील रहिवाशी असलेल्या ५५ वर्षीय वृध्द रुग्णांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यु झाला. हा व्यक्ती ता. १५ जूलै रोजी उपचारासाठी दाखल झाला होता.
  
जिल्ह्यात सध्या ३५५ एवढी झाली आहे

त्याला इतरही आजार होते हे स्पष्ट झाले आहे. तसेच परभणी शहरातील मुमताज नगरमधील रहिवाशी असलेल्या एका ५० वर्षीय रुग्ण ता. १३ जूलै रोजी उपचारासाठी भरती झाला होता. त्याच्यावर जिल्हा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. त्याला कोरोनासोबतच मधुमेहाची तक्रार असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा ता. १८ जूलै रोजी उपचारा दरम्याम मृत्यु झाला आहे. कोरोना विषाणु संसर्गाच्या उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३५५ एवढी झाली आहे. त्यातील १५५ जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या १८८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ७५९ संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी हॉस्पीटलमधील संसर्गजन्य कक्षात २१८ जण भरती आहेत. त्यापैकी ७२७ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर दोन हजार ८१४ लोकांनी विलगीकरणाचा कालावाधी पूर्ण केलेला आहे.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यासाठी नविन १६ रुग्णवाहिकांची खरेदी- पालकमंत्री नवाब मलिक

आज आणि उद्या जिल्ह्यात संचारबंदी

कोरोना विषाणु संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवार व रविवार हे दोन दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतराना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. सोमवार (ता.२०) पासून संचारबंदी शिथील केली जाईल अशी माहिती पालकमंत्री नवाब मलीक यांनी शुक्रवारी दिली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two elderly people died due to corona in Parbhani district parbhani news