
पाथरी : श्रावणी सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या कावड यात्रेतील सुमारे २५० भाविक परतीच्या मार्गावर असताना पहाटे अंदाजे ५ वाजता कार थेट यात्रेत घुसली या अपघातात दोन भाविक जागीच ठार तर चार जण जखमी झाले, ही घटना पाथरी - सेलू रस्त्यावरील खेडुळा पाटीवर सोमवार (ता.११) पहाटे पाच वाजता घडली.