satish kolate and aaditya kolate
sakal
फुलंब्री - फुलंब्री–राजूर रस्त्यावरील पिंपळगाव गांगदेव शिवारात आयशर ट्रक आणि कार यांचा शुक्रवारी (ता.१२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.