esakal | चोरट्यांनी पळवला पावणेतीन लाखांचा माल, स्कूटी चोरून पुन्हा सोडली घराजवळ
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

लातूर येथील एका सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या स्कूटीत ठेवलेले एक लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आणि एक लाख वीस हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख ८६ हजार रुपयांचा माल चोरांनी लंपास केला आहे.

चोरट्यांनी पळवला पावणेतीन लाखांचा माल, स्कूटी चोरून पुन्हा सोडली घराजवळ

sakal_logo
By
हरि तुगावकर

लातूर  :  येथील एका सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या स्कूटीत ठेवलेले एक लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आणि एक लाख वीस हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख ८६ हजार रुपयांचा माल चोरांनी लंपास केला आहे. या घटनेत चोरांनी स्कूटीची पहिल्यांदा चोरी केली. त्यातील माल लंपास केला आणि परत स्कूटी व्यापाऱ्याच्या घराजवळच नेवून ठेवली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


येथील गोपाळ अग्रोया हे सराफ व्यापारी आपले दुकान बंद करून आपल्या स्कूटीवर (एमएच २४, बीडी ५६७३) बसून घराकडे जात होते. या स्कूटीच्या डिक्कीत त्यांनी एक लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आणि एक लाख वीस हजार रुपये रोख ठेवले होते. वाटेत त्यांनी औसा रस्त्यावरील मॉजिनीज बेकरीच्या समोर त्यांनी आपली गाडी पार्क केली. बेकरीचे सामान घेण्यासाठी ते बेकरीत गेले होते.

बेकरीचे सामान घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना आपल्या स्कूटीची चोरी झाल्याचे लक्षात आले. यात चोरांनी स्कूटीची चोरी केली. स्कूटीच्या डिक्कीतील दोन लाख ८६ हजार रुपयांचा माल लंपास केला. त्यानंतर ही स्कूटी सराफ व्यापारी गोपाळ अग्रोया यांच्या औसा रस्त्यावरील लक्ष्मीधाम कॉलनीत असलेल्या घराजवळ नेवून ठेवली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image